जुने नाशिक- सारडा सर्कल ते गडकरी चौक अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. मात्र मार्गाच्या दोन्ही बाजूने कार डेकोरेटर व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यांच्याकडे कामासाठी येणारी वाहने विशेषतः चारचाकी मुख्य रस्त्यावरच उभ्या करून काम केले जाते. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या अतिक्रमणाची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.