Nashik News : ‘सरला एक कोटी’ प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरेल; कलावंतांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor of the film 'Sarla Ek Koti' while interacting with Tanishka members during a visit to Sakal' Satpur office.

Nashik News : ‘सरला एक कोटी’ प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरेल; कलावंतांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

नाशिक : येत्‍या २० जानेवारीला प्रदर्शित होत असलेला ‘सरला एक कोटी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास कलावंतांनी व्‍यक्‍त केला. मंगळवारी (ता.३) नाशिक दौऱ्यावर असलेल्‍या कलावंतांनी ‘सकाळ’ सातपूर कार्यालयास भेट देताना उपस्‍थित तनिष्का सदस्‍यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. (Sarla Ek koti will liked by audience marathi movie Artists expressed faith at satpur sakal office nashik news)

अभिनेत्री ईशा केसकर आणि विनोदवीर ओंकार भोजने यांची ‘सरला एक कोटी’ चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. पत्त्यांचा गॅम्बलर असलेला भिका (ओंकार भोजने) आणि सौंदर्याची खाण असलेली सरला (ईशा केसकर) यांचे लग्‍न होते.

आपल्या सासूसोबत (छाया कदम) आणि नवऱ्यासोबत राहणाऱ्या सरलावर गावातल्या लोकांची वाईट नजर आहे. गरीब कुटुंबातील आणि पत्त्यांचे व्‍यसनातून घडणारे प्रसंग या चित्रपटातून मांडलेले आहेत.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Nashik News : सुरगाणा ठरतोय स्ट्रॉबेरी पंढरी! चांगल्या उत्पादनाने आदिवासींचे स्थलांतरही थांबले

कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, विजय निकम, यशपाल सारनाथ हे कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. कलावंतांचा अभिनय चित्रपटात बघायला मिळेल. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित असलेला सरला एक कोटी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे.

कलाकारांनी जाणून घेतली ‘तनिष्कां’ ची माहिती

सिनेकलाकारांची भेट म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती व नव्या वर्षांत तनिष्का भगिनींना अनोखी भेट मिळाली. तनिष्का व्यासपीठाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी संयोजन केले. या भेटीदरम्‍यान तनिष्का व्यासपीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थित सिनेकलाकारांनी जाणून घेत उपक्रमांचे कौतुक केले.

हेही वाचा: Nashik News: FCIचा कारभार चव्हाट्यावर! प्रश्‍नांची उत्तरे न दिल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी