Accident
sakal
वीरगाव/सटाणा: वनोली (ता. बागलाण) गावाजवळ साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. ८) सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन भाऊ व एक व्यक्ती अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. हॉटेल अधिराजवळील तीव्र वळणावर हा अपघात झाला. हे तिघेही सटाणा शहरातील सुकडनाला भागातील रहिवासी होते.