सटाणा: बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत असलेले येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा २१० वा जन्मोत्सव देवस्थान ट्रस्टतर्फे मंगळवारी (ता.२) मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराजांच्या जीवनावरील ‘यशवंत लीलामृत’ या ग्रंथ पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या वेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.