Cold Wave Hits Satana and Baglan Taluka : सटाणा व बागलाण तालुक्यात थंडीच्या तीव्र लाटेमुळे नागरिक शेकोट्या आणि उबदार कपड्यांमध्ये दिसत आहेत; आरोग्य विभागाने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
सटाणा: अवकाळी पावसाच्या संकटानंतर आता बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे.