Satana News : शाळेत जातो म्हणत घराबाहेर पडला... परतलाच नाही!
Class 10 Student Goes Missing from Chaugaon Village : शाळेत जातो सांगून घरातून निघालेल्या चौगावातील दहावीच्या विद्यार्थ्याचा दोन दिवसांनंतरही शोध लागलेला नसल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सटाणा- दोन दिवसांपूर्वी शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या चौगाव (ता.बागलाण) येथील दहावीचा विद्यार्थी दोन दिवसांनंतरही तो कुठेही न सापडल्याने सटाणा पोलीसांत मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.