Satana News : सटाणा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपात सहभाग; वेतनवाढीचा प्रस्ताव २२ महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित, न्यायालयातील कामकाज ठप्प

दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव तब्बल २२ महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित असल्याने अखेर राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
Judicial staff staging a sit-in protest (dharna) on the court premises here, as part of a state-wide strike demanding a revised pay scale.

Judicial staff staging a sit-in protest (dharna) on the court premises here, as part of a state-wide strike demanding a revised pay scale.

sakal

Updated on: 

सटाणा - दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव तब्बल २२ महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित असल्याने अखेर राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी आज मंगळवार (ता.१७) पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला असून, सटाणा न्यायालयातील सर्व कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...