Satana News : ईव्हीएम सुरक्षित पण विद्यार्थी असुरक्षित! निवडणूक व्यवस्थेमुळे ४ हजार विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

EVM Security Measures Affect Student Safety in Satana : सटाणा नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिन्स सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली शालेय संकुलाचे पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद केल्याने, सुमारे ४००० विद्यार्थ्यांना अरुंद व वर्दळीच्या रस्त्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
student safety issue

student safety issue

sakal 

Updated on

सटाणा: ईव्हीएम मशिन्स सुरक्षित; पण विद्यार्थी असुरक्षित असा विरोधाभासी संदेश शहरातील नगर परिषद निवडणूक व्यवस्थेतून दिला जात असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोग व प्रशासनाने ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी हजारो विद्यार्थ्यांचे शाळेचे पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद केल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांना रोज जीव धोक्यात घालून अरुंद व वर्दळीच्या दोधेश्वर नाका व नामपूर रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com