Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Satana Bribery Case Officer Caught Red Handed by ACB: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करतानाही लाचेचा अडथळा; सटाण्यात एसीबीची मोठी कारवाई
Satana Bribery Case Land Records Officer Caught Red Handed Accepting 500 Rupees for Ancestral Property Name Transfer

Satana Bribery Case Land Records Officer Caught Red Handed Accepting 500 Rupees for Ancestral Property Name Transfer

esakal

Updated on: 

सटाणा : शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, सटाणा येथील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकाला अवघ्या ५०० रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. देवेंद्र मधुकर भावसार (वय ५१) असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या उपअधीक्षकाचे नाव असून, सोमवार (ता.२) रोजी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान सटाणा येथीलभूमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...