जुनी शेमळी- सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आघार शिवारातील शेतकरी हॉटेलसमोर मालवाहतूक मॅक्सिमो (एमएच ४७ वाय ५७५२) व मालवाहतूक ट्रक यांचा समोरासमोर अपघात होऊन अजमीर सौंदाणे येथील तरुण ललित सोनवणे (वय १८), कऱ्हे येथील तरुण राज ठाकरे (१९) यांचा मृत्यू झाला. अपघातातील तिसरा तरुण गंभीर जखमी आहे.