Mudra loan fraud
sakal
सटाणा: बागलाण तालुक्यात लघुउद्योगासाठी मुद्रा कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या शुभम प्रकाश देवरे (रा.सोयगाव, मालेगाव) या संशयितास सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीस सटाणा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.