fazal shaikh and gajala shaikh
sakal
सटाणा - गणेशोत्सवाच्या उत्साहात सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत चौगाव रस्त्यावरील सर्वेश्वरी महिला सामाजिक मंडळाने यंदा आगळावेगळा उपक्रम राबविला. मंडळाने मुस्लिम दाम्पत्याला गणरायाच्या महाआरतीचा मान देत धार्मिक ऐक्याची प्रेरणादायी प्रचिती घडवून आणली. फजल शेख यांनी पत्नी सौ.गजाला शेख यांच्यासह गणरायाची मनोभावे महाआरती केली. या उपक्रमाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले.