Highway
sakal
सटाणा: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ च्या काँक्रिटीकरणाचे काम फक्त सटाणा पालिका हद्दीत अतिक्रमणाच्या नावाने ठप्प झाले आहे. पालिका प्रशासन, तालुका भूमापन अधिकारी, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण काढण्याची जबाबदारी झटकत आहेत.