सटाणा- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रलंबित असल्याने रोज अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील मूलभूत आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासन या कामात सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात दिली आहे.