Mumbai High Court
sakal
सटाणा: भाक्षी (ता. बागलाण) येथील माजी सरपंच पूनम सूर्यवंशी, ग्रामसेवक निसार शेख व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी विकासकामांमध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी पंधरा दिवसांत कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे व आश्विन डी. भोबे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाने आदेश देऊनही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा आदेश देत संबंधितांना तंबी दिली आहे.