Nashik Crime News : सटाणा पोलिसांची अवैध व्यवसायिकांविरोधात धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Under the leadership of Kiran Patil, the police seized the items in a raid at Manoor (Deolipada district Baglan).

Nashik Crime News : सटाणा पोलिसांची अवैध व्यवसायिकांविरोधात धडक कारवाई

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत.

पोलिसांनी तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मानूर (देवळीपाडा) येथे सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या विक्री होत असलेला देशी - विदेशी दारूचा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच ठेंगोडा (ता.बागलाण) नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. याप्रकरणी दोघा संशयित विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Satana Police raid against illegal traders Nashik Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सटाणा पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांना तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मानूर (देवळीपाडा) येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या देशी - विदेशी मद्याची खुलेआम विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी मानूर येथील पंढरीनाथ भालचंद्र गांगुर्डे यांच्या घरावर छापा मारला असता त्याठिकाणी अवैधरीत्या साठवून ठेवलेला सुमारे ३० हजार रुपये किमतीचा देशी, विदेशी मद्याचा साठा आढळून आला.

दुसऱ्या एका घटनेत ठेंगोडा (ता. बागलाण) येथे पहाटेच्या सुमारास गणपती मंदिराच्या मागील बाजूस शासनाचा कुठलाही परवाना नसताना खुलेआम एका वाहनावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चेतन पाटील (२२, गांगवण ता. कळवण) या वाहनचालकास ताब्यात घेत वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई हवालदार जयंत साळुंखे, अजय महाजन, अशोक चौरे, श्रीमती कावळे, पंकज शेवाळे व श्री. सोनवणे यांनी केली.