

सटाणा शहरातील वाढीव घरपट्टीवरून नागरिकांचा आक्रोश; माजी आमदार संजय चव्हाण यांची मार्च २०२७ पूर्वी दरकपातीची आग्रही मागणी, एकनाथ शिंदे यांच्या अपूर्ण आश्वासनाची आठवण
Sakal
सटाणा : येथील पालिकेकडून आकारल्या जाणार्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीच्या जाहीर सभेत घरपट्टी कमी करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची आठवण करून देत बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी याप्रश्नी राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देत मार्च २०२७ पुर्वी शहरवासीयांची घरपट्टी कमी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.