

NCP Holds Three Hour Sit In Protest in Nashik Over Delayed Satana Sakri Shirdi National Highway Road Construction Work
esakal
-रोशन खैरनार
सटाणा: शहरातून जाणार्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत नाशिक येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून अनोख्या गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. महामार्गाच्या कामाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी कार्यालयालाही कुलूप ठोकले. अखेर येत्या गुरुवार (ता.२६) पासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन महामार्ग विभागाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.