Satana News : चिमुकल्या यशच्या उपचारांसाठी शिक्षिका ज्योत्स्ना पाटील यांचा मदतीचा हात; दानशूर व्यक्ती, संस्था व नागरिकांकडे मदतीचे आवाहन

प्राथमिक शाळेतील सहावीचा विद्यार्थी यश विष्णू गवळी झाडावरून तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली.
jyotsna patil

jyotsna patil

sakal

Updated on: 

सटाणा - उमाजीनगर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीचा विद्यार्थी यश विष्णू गवळी झाडावरून तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली. या कठीण प्रसंगी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका ज्योत्स्ना पाटील यांनी पुढाकार घेत स्वतः भरीव मदत देत शिक्षक, पालक, नातेवाईक व नागरिकांकडूनही मदत उभी केली. अवघ्या दोन दिवसांत सुमारे ४० हजार रुपयांचा निधी जमा करून त्यांनी तो यशच्या पालकांकडे सुपूर्द केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com