Voter List Duplication Controversy
sakal
सटाणा: सटाणा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेला ३९३७ नावे दुबार नोंदविण्याचा प्रकार हा थेट लोकशाहीचा खून आहे, अशी तीव्र टीका करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सटाणा शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष भारत काटके व कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे.