Crime
sakal
नाशिक: निवडणुकीत कमी दराच्या नोटांच्या मोबदल्यात जादा दराच्या नोटा देण्याचे व मूळ रकमेच्या १० टक्के जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवून संशयित प्रकाश लोंढे याच्या सांगण्यावरून संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून एका औषधविक्रेत्याचे ३० लाख रुपये हिसकावले. या प्रकरणी प्रकाश लोंढे आणि दीपक ऊर्फ नाना लोंढे या पिता-पुत्रासह संशयित टोळीविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.