EPF Pension Protest
sakal
सातपूर: किमान नऊ हजर रुपये पेन्शनमध्ये वाढ, महागाई भत्ता आणि इतर मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्त कार्यालयावर पेन्शनधारकांनी बुधवारी (ता.११) धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.