नाशिक- सातपूर येथील प्रबुद्ध नगर परिसरातील आरती किराणा दुकानातून चोरट्याने ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. माणिक देवचंद अहिरे (६४, रा. कार्बन नाका) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने १ ते २ जून दरम्यान, दुकानाचा पत्रा उचकटवून गल्ल्यातील रोख ४० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.