Satpur MIDC
sakal
सातपूर: नाशिक औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा ‘तुकडा गँग’ची कारस्थाने उघडकीस आली आहेत. अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील जुनी कांदा फॅक्टरी (प्लॉट क्रमांक १७-१८) या १८ एकर भूखंडाचे बेकायदा विभाजन करून कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. हा विषय थेट विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या दालनात पोहोचला असून, त्यांनी एमआयडीसीला १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.