Crime
sakal
सातपूर: श्रमिकनगर परिसरात बुधवारी (ता.२४) रात्री घडलेल्या जगदीश परशराम वानखेडे (३०) या युवकाच्या खुनातील संशयितांना सातपूर पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी बजावली. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.