सातपूर: अंबड-सातपूर लिंक रोड परिसरातील पाटील पार्क येथे साधूंच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी एका महिलेला भुरळ पाडून तिच्याकडून २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १०) घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.