Someshwar News : सोमेश्वर येथे ₹७८ कोटींचा भव्य गोदाघाट साकारणार; आमदार सीमा हिरे यांच्या पाठपुराव्याला यश!
Seema Hire’s Follow-up Brings Major Pilgrimage Boost : आमदार सीमा हिरे यांच्या पाठपुराव्यामुळे सोमेश्वर धबधबा आणि नवश्या गणपती परिसरात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून ७८ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चातून भव्य गोदाघाट उभारण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे.
सातपूर: सोमेश्वर धबधबा, बालाजी मंदिर व नवश्या गणपती परिसरात भव्य घाट उभारणीसाठी आमदार सीमा हिरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. घाट उभारणीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्याने आता लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.