Water Campaign : सोशल नेटवर्किंग फोरमच्या जलाभियानामध्ये सातपुतेपाडा हे तिसावे गाव झाले टंचाईमुक्त!

तरुण गमावलेल्या मुलाच्या स्मरणार्थ पोचवले पाणी
Inauguration of Jalabhiyana of Social Networking Forum at Satputepada (Peth).
Inauguration of Jalabhiyana of Social Networking Forum at Satputepada (Peth).esakal

Water Campaign : सोशल नेटवर्किंग फोरमच्या जलाभियानातंर्गत सातपुतेपाडा (ता. पेठ) हे तिसावे गाव टंचाईमुक्त झाले आहे. तरुण वयात गमावलेल्या मुलाच्या स्मरणार्थ पाणी पोचवण्यात आले. मिस्त्री कुटुंबीयांनी सामाजिक योगदान दिले आहे.

तुषार मिस्त्री कुटुंबीय आणि २००४ च्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आर्थिक सहाय्य केले. (Satputepada became third village in Jal abhiyan of Social Networking Forum to be free from shortage nashik news)

प्रकल्पाचे उदघाटन नाशिकचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, स्मिता बच्छाव, मदतकर्ते छाया आणि तुषार मिस्त्री, फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड, सरपंच संदीप भोये यांच्या हस्ते करण्यात आले.

मिस्त्री कुटुंबातील साहिल हा मुलाचे तरुण वयात दुर्दैवी निधन झाले. आपल्यावर झालेला हा आघात सहन करून मुलाच्या स्मरणार्थ मिस्त्री कुटुंबीयांनी सातपुतेपाडा गावासाठी मदत करण्याचे ठरवले.

त्यांच्या या निर्णयाने समाजात एक आदर्श पायंडा पाडला असून त्यातून दुर्गम भागातील लोकांच्या दारात पाणी पोचले. ही एक क्रांतिकारी घटना असल्याचे श्री. बच्छाव यांनी सांगितले. तसेच आरटीओ अधिकाऱ्यांचे समाजासाठीचे उत्तरदायित्वही वाखाणण्याजोगे असून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही मदत केली असे श्री. मिस्त्री यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Inauguration of Jalabhiyana of Social Networking Forum at Satputepada (Peth).
10th Re Exam 2023 : शालांत पुरवणी परीक्षेसाठी या तारखेपर्यंत मुदत

ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. गावात पाणी आल्याचा आनंदोत्सव साजरा केला. प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, अमृता कदम, मनिषा निमसे, संदीप निमसे, उज्वला बोधले, राजेंद्र पाटील, स्मिता पाटील, अभियंता प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, जयदीप गायकवाड, विजय भरसट, उपसरपंच छबिलदास आवारे, गणेश सातपुते, राहुल गाडगीळ आदी उपस्थित होते.

दरम्यान, जुनोठी ग्रामपंचायतीतंर्गतचा सातपुतेपाडा गेली अनेक वर्षे पाणीटंचाईला तोंड देत होता. उन्हाळ्यात दोन ते अडीच किलोमीटरवरून पाणी आणावे लागायचे. त्यावर उपाय म्हणून गावाजवळ पाण्याचा स्रोत शोधला आणि स्थानिकांच्या श्रमदानातून विहीर खोदली.

तेथून पाणी आणण्यासाठी पाइपलाइन, वीजपंप, आणि टाकीची गरज होती. त्यासाठी मिस्त्री कुटुंबीय आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत केली. जुनोठी ग्रामपंचायतीने टाकीची जबाबदारी घेतली.

Inauguration of Jalabhiyana of Social Networking Forum at Satputepada (Peth).
Bank Election : छाननीत 122 अर्ज वैध, आता लक्ष माघारीकडे; छाननीत 3 अर्ज बाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com