सटाणा- समाजकल्याण अधिकारी असल्याचे भासवत नागरिकांना गंडवणाऱ्या संशयित विनायक देशपांडे उर्फ प्रणित कैलास पवार या तोतया अधिकाऱ्याला सटाणा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवार याने जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. तपासात अनेक प्रकारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.