Satyajeet Tambe
Satyajeet TambeEsakal

Satyajeet Tambe : 'काँग्रेसमधील काही लोकांनी जाणीवपूर्वक...', सत्यजित तांबेंनी व्यक्त केली खंत

नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला

नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजित तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणूसाठीचे मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, माझ्या वडिलांनी गेली 14 वर्षे या जिल्ह्यांमध्ये काम केलं. येथील मतदारांशी ऋणानुबंध निर्माण केले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याची दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत दिसून येत आहेत. सर्व पक्षांचे कार्यकर्ते भेदाभेद विसरून माझ्यासोबत दिसून येत आहेत. त्याच कारण म्हणजे आम्ही फक्त निवडणुकीपुरतेच राजकारण करतो. निवडणूक झाल्यावर आमच्या परिवाराने एक पथ्य पाळलं आहे. आम्ही सामन्यांच्या प्रश्नांवर काम करतो असं सत्यजित तांबे बोलताना म्हणाले आहेत.

Satyajeet Tambe
कोण मारणार बाजी! नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान

तर पुढे ते म्हणाले की, 100 पेक्षा जास्त संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळालं आहे. विजय झालाच आहे. परंतु आता फक्त उत्सुकता इतकी आहे की, मताधिक्य किती होतं. मतदान किती जास्त झालं आहे ते. त्यानंतर त्यांनी इतर कोणत्या पक्षासोबत जाण्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले मी अपक्ष आहे आणि अपक्ष राहणार आहे.

"मी लवकरच गेल्या काही दिवसातील घडामोडी घडल्या त्या येत्या काही दिवसांत सांगेन. काँग्रेसमधील काही लोकांकडून आमच्या परिवारावर आरोप करण्यात आले. त्यांच्याबद्दल मी काही दिवसांत सांगेन" असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहे.

Satyajeet Tambe
Jalgaon News : बंजारा समाजाच्या मेळाव्यात योगी आदित्यनाथांची उपस्थिती; शिंदे-फडणवीसांचा दौरा मात्र रद्द

पुढे बोलताना त्यांनी सांगितल की मो फॉर्म भरताना काँग्रेसच्या नावावर फॉर्म भरला होता. त्यासोबत एबी फॉर्म जोडू शकलो नाही त्यामुळे माझा फॉर्म अपक्ष म्हणून जमा करण्यात आला. यावरतीही काही खुलासे मी योग्य वेळी बोलेन असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान आज पार पडत आहे. या निवडणूकीत चुरशीची होणार हे ठरलेलच आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे काँग्रेसचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ही मतदारांशी गाठी भेठी घेवून चांगला जनसंपर्क मतदार संघात वाढवल्याचे पाहिला मिळत आहे.

पदवीधर निवडणूकीसाठी नाशिक विभागात जवळपास २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. मात्र काही पदवीधरांची नावेच मतदार यादीत नसल्याचे धांदल उडाली आहे. तर काही पदवीधरांनी नाव नोंदणी न केल्याने त्यांना पदवीधरसाठी मतदान करता येणार नाही.

Satyajeet Tambe
खासदार नवनीत राणा यांचे वडील फरार म्हणून घोषित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com