Nashik News : बिबट्याशी कडवी झुंज देत वाचविले मित्रांचे प्राण; 2 विद्यार्थी जखमी

निसर्गाची किमया मोठी अगाध आहे. नशिबाची दोरी लांब असली तर तेथे कुणाचेच काही चालत नाही.
leopard
leopardesakal

Nashik News : निसर्गाची किमया मोठी अगाध आहे. नशिबाची दोरी लांब असली तर तेथे कुणाचेच काही चालत नाही. असाच प्रत्यय शुक्रवारी (ता.२६) देशभर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना शाळकरी मुलांवर बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याबाबत आला आहे.

स्वतःवरील विश्वास व दुसऱ्याप्रती जिव्हाळ्यामुळे एका मित्राने आपल्या जिवलग तीन मित्रांना साक्षात मृत्यूच्या दाढेतून खेचून आणत ‘ही दोस्ती तुटायची नाय’ची अनुभूती दिली आहे. (saved lives of his friends by fighting bitterly with leopard nashik news)

इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून बिबट्याशी एकाकी झुंज देणाऱ्या योगेश रामचंद्र पथवे या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने तीन मित्रांचे प्राण वाचविले आहेत. योगेश मित्र प्रवीण, नीलेश व सुरेश यांच्यासह घरातून शाळेच्या दिशेने जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

leopard
Nashik News : श्‍यामची आई कादंबरी नव्हे, एक संस्कारग्रंथ : डॉ. बोकील-कुलकर्णी

या कठीण व जीवघेण्याप्रसंगी योग्य ती समयसूचकता दाखवत योगेशने प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलत बिबट्याशी कडवी झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला. मात्र या घटनेत योगेश जखमी झाला. वारंवार प्रतिकारासह अन्य मित्रांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

या बाका प्रसंगात जखमी योगेशला मित्रांनी पुढील उपचारासाठी घोटी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा यांनी ह्या परिसरात पिंजरा लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, जखमी विद्यार्थ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. धाडसी योगेशचे इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

leopard
Nashik News : आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम करण्यात सहकाराचा वाटा : केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com