Nashik ZP News: टंचाई कृती आराखड्याबाबत जिल्हा परिषद उदासीन; नोव्हेंबर उजाडूनही होईना जिल्हा टंचाई कृतिआराखडा

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik News: जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू असताना दुसरीकडे निम्मा नोव्हेंबर संपत आलेला असतानादेखील जिल्ह्याचा टंचाई कृतिआराखडा तयार झालेला नाही.

अहमदनगर जिल्ह्याचा टंचाई कृतिआराखडा तयार होऊन त्यास मंजुरीदेखील झाली. मात्र, नाशिक जिल्ह्याचा आराखडा अद्याप तयार झालेला नाही. यावरून जिल्हा परिषद प्रशासन टंचाई आराखड्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.

गत वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणे ओव्हरफ्लो होती. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होती. (scarcity action plan of district has not been prepared by zp nashik news)

पर्यायाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात टंचाईच्या झळा लागल्या नाहीत. मात्र, मार्च ते जून २०२३ या टप्प्यात टंचाई मोठी जाणवली. या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील टॅंकरची संख्या १५० वर पोचली होती. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने टंचाईच्या झळा ऑगस्ट- सप्टेंबरपासून जाणवू लागल्या असल्याने टॅंकर सुरू झालेले आहेत.

साधारण १५ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसाचा अंदाज घेऊन दर वर्षी टंचाई कृतिआराखडा तयार होत असतो. यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुकानिहाय आराखडे मागविले जातात. सप्टेंबर महिन्यांपासून विभागाकडून तालुका आराखडे मागविले जात आहेत.

परंतु अद्यापही १५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यांतून आराखडे प्राप्त झालेले नाही. बागलाण व कळवण तालुक्याने अद्यापही आराखडे सादर केलेली नाही. सर्व तालुका आराखड्यावरून जिल्हा टंचाई कृतिआराखडा तयार केला जातो.

Nashik ZP News
Panchavati Express Library: पंचवटी एक्स्प्रेस ग्रंथालयात वाढली पुस्तकांची संख्या!

परंतु २० नोव्हेंबर उजाडूनदेखील अद्याप हा आराखडा तयार झालेला नाही. एव्हाना टंचाई कृतिआराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

विभागाला अधिकारी नसल्याचा फटका

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत. सध्या या पदाचा पदभार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडे आहे. विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळावा, यासाठी प्रशासनाने पाच पत्र मंत्रालयात दिली आहेत. मात्र, अद्यापही अधिकारी मिळालेला नाही. कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्याकडे बांधकाम मोठा विभाग आहे. ग्रामीण पाणीपुरवठ्यात जलजीवनच्या कामांवर त्यांचा भर असतो. त्यामुळे आराखड्यास उशीर होत असल्याची चर्चा आहे.

आठवड्यात वाढले सहा टॅंकर

गत आठवड्यात ३४० गावे, वाड्या यांना ९८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, आठवडाभरात टंचाईच्या झळा वाढल्याने टॅंकरच्या संख्येत सहाने वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत १३१ गांवे, २३७ वाड्या अशा एकूण ३६८ गावे-वाड्यांना १०४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टॅंकर नांदगाव तालुक्यात सुरू आहेत.

Nashik ZP News
Nashik Police Transfer: धुळे पोलिस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; नाशिकच्या माधुरी कांगणे यांची पुण्यात बदली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.