स्कूल कनेक्ट अंतर्गत विद्यार्थिनींनी अनुभवले महाविद्यालयीन शिक्षण विश्व

स्कूल कनेक्ट अंतर्गत विद्यार्थिनींनी अनुभवले महाविद्यालयीन शिक्षण विश्व
Published on: 
स्कूल कनेक्ट उपक्रमात विद्यार्थिनींनी अनुभवले शिक्षण विश्व सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर,ता.२७ ः येथील पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात स्कूल कनेक्ट उपक्रमांतर्गत कॅम्पस टूर उपक्रमात आर.बी.एच. कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेज के.बी.एच. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या विविध संधींची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. डॉ. भारद्वाज यांनी विद्यार्थिनींनी केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता ज्ञान, कौशल्ये, आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारक्षमता विकसित करावी, असे आवाहन केले. आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी व सक्षम व्हावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विविध विभाग आणि विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींनी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र, मानसशास्त्र, संगणक, ग्रंथालय आणि क्रीडा विभागांना भेट दिली. संबंधित प्राध्यापकांनी विभागांतील सुविधा, प्रात्यक्षिके, अभ्यासासाठी उपलब्ध साधने आणि विविध विषयांतील करिअरच्या संधींची माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ. दीपांजली बोरसे, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. प्रज्ञा सुरवसे, डॉ. वैजयंती रामावत, समन्वयक प्रा. नवनीता देसले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com