नाशिक - विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अमर्याद प्रवासी वाहतुकीला आळा बसण्यासाठी स्कूल व्हॅन व रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. दुसरीकडे देशाचे उद्याचे भविष्य म्हणून ज्या शालेय मुलांकडे पाहिले जाते, त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, शहर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) याकडे सोयीस्कर कानाडोळा करीत आहे.