नाशिक- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार लागणाऱ्या निधीची तरतूद न केल्याने दोन दिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारले होते. त्यानुसार मंगळवारी (ता.८) जिल्ह्यातील १४२ शाळांवर बंदचा परिणाम झाला. या शाळांतील सुमारे बाराशे शिक्षक मुंबईत आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाले.