esakal | नाशिक : ११ वीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफ ९० टक्क्‍यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Admissions

नाशिक : ११ वीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफ ९० टक्क्‍यांवर

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठीची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी (ता. १३) प्रसिद्ध झाली. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अद्यापही करडी स्‍पर्धा बघायला मिळत आहे. यामुळे तिसऱ्या यादीतील विज्ञान शाखेचा खुल्‍या प्रवर्गाचा कट-ऑफ ९० टक्क्‍यांपर्यंत उंचावलेला राहिला. केटीएचएम महाविद्यालयातील अनुदानित जागेसाठी ९१.२ टक्‍के कट-ऑफ राहिला. दरम्‍यान, यादीत दोन हजार ६२९ विद्यार्थ्यांच्‍या नावांचा समावेश असून, प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्‍यांना बुधवार (ता. १५)पर्यंत मुदत असेल.


अकरावी प्रवेशाच्‍या तिसऱ्या फेरीसाठी सात हजार ७५२ विद्यार्थी पात्र ठरले होते. यापैकी दोन हजार ६२९ विद्यार्थ्यांची यादीत निवड झाली आहे, तर पाच हजार १२३ विद्यार्थ्यांना कुठलाही पसंतीक्रम मिळालेला नाही. ६६६ विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. ६२६ विद्यार्थ्यांना द्वितीय, ४७१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

तिसऱ्या फेरीसाठी १३ हजार ९१८ जागा उपलब्‍ध होत्‍या. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांनी अवघे एक किंवा दोन महाविद्यालयांची नावे पसंतीक्रमात नोंदविली होती. अशा पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पर्याय उपलब्‍ध होऊ शकला नाही. तिसऱ्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर गुरुवारी (ता. १६) रात्री आठपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांना कोट्यांतर्गत रिक्‍त राहिलेल्‍या जागा केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्‍यार्पित करण्यासाठी मुदत दिली आहे. यानंतर रात्री अकराला केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेसाठी रिक्‍त जागांचा अद्ययावत तपशील संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर उर्वरित रिक्‍त जागांवर प्रवेशाच्‍या प्रक्रियेला गती मिळेल, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव नाशिकच्या मराठी सेलिब्रिटींचा…!!शहरातील काही महाविद्यालयांतील कट-ऑफ असा
(खुल्‍या गटाचा अनुदानित जागांसाठी)
महाविद्यालय विज्ञान वाणिज्‍य कला
केटीएचएम ९१.२ ८७.६ ७१
एचपीटी व आरवायके ८९.४ -- ७३.२
भोसला महाविद्यालय ८७.६ ८६.४ ७२
व्‍ही. एन. नाईक (विनाअनुदानित) ८८.६ ७१.८ ६६.८

हेही वाचा: नाशिक-पुणे महामार्गावर जीवघेणे खड्डे; प्रवासी त्रस्त

loading image
go to top