'बॉश’ कंपनीत चोरी प्रकरणी भंगार व्यावसायिकाला अटक

bosch
bosch Goole

सातपूर (नाशिक) : बॉश (Bosch) कंपनीतील चोरी प्रकरणी सातपूर पोलिसानी कंपनीतील माजी भंगार ठेकेदार फकरुद्दीन खान याला ताब्यात घेतले. यामुळे चोरीची साखळी उलगडली जाणार आहे. अनेक मोठे चेहरे समोर येणार असल्याने कंपनींतर्गत चलबिचल सुरू झाल्याचे पाहायला मिळते. (scrap dealer arrested in bosch company theft case in nashik)

चौकशीदरम्यान माजी भंगार ठेकेदार फकरुद्दीन खान याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. फकरुद्दीन खानमुळे कंपनीत आतापर्यंत ज्या चोऱ्या झाल्या, याबाबत उलगडा होणार आहे. कंपनींतर्गत व कंपनीबाहेर असलेल्या अनेक मोठ्या चेहऱ्यांवरील पडदा उठणार असल्याचे पोलिससूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कंपनीत भंगार ठेका मिळविण्यासाठी खानने थेट मंत्रालयातूनच फिल्डिंग लावली होती. चांगले उत्पादन भंगार गाडीत टाकून बाहेर काढत परराज्यात विक्री करणारे रॅकेट समोर आल्याने कंपनीने त्याचा ठेका रद्द केल्याचे बोलले जाते.

bosch
नाशिक जिल्‍ह्यात आज १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्‍ह

कंपनीतील उत्पादन प्रक्रियेच्या विभागातून काही कर्मचाऱ्यांकडून पार्ट बाथरूममध्ये आणले जात होते. त्यानंतर कॅन्टीनमध्ये काम करणारे ठेकेदार, कामगार कचऱ्याच्या डब्यात टाकून ते बाहेर घेऊन जात होते. सुरक्षारक्षक ही फारशी तपासणी करत नसल्याने हा माल बाहेर आल्यानंतर संबंधितांना फोन करून भंगार मार्केटमध्ये विकला जात, अशी माहिती समोर आल्याने पोलिसांनी संशयिताना घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. चोरी प्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षकांबरोबर, स्वच्छता कर्मचारी, तसेच आजी-माजी भंगार व्यावसायिकांकडे मोर्चा वळला होता.

(scrap dealer arrested in bosch company theft case in nashik)

bosch
नाशिक शहरात १५१ घरे अतिधोकादायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com