नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे मात्र शहराच्या विद्रूपीकरणाला हातभार लावणारे घटक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात भंगार बाजार हा महत्त्वाचा घटक बनला आहे. शहराच्या बाह्यवळण रस्त्यांवरून जाताना भंगाराचे मोठे बाजार निदर्शनास येत असून यातील जवळपास सर्वच बाजार अनधिकृत आहे.