Nashik News : बेवारस वाहनांचा लागणार शोध! पुण्याच्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे सहकार्य

शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
abandoned vehicles police station
abandoned vehicles police stationesakal

पंचवटी : शहरातील पोलिस ठाण्यांच्या आवारात शेकडो वाहने बेवारस वाहने धूळखात पडली आहेत. वाहनांचे मालक सापडत नसल्याने पोलिसांचीदेखील डोकेदुखी वाढली असून वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया किचकट असल्याने वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने सांभाळण्याची जवाबदारी पोलीसांवर आली आहे.

परंतु पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यातून मार्ग शोधत शहर पोलिस अन् तळेगाव दाभाडे, पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांच्या मदतीने म्हसरूळ पोलिस ठाण्यातील ७३ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध लागला असून त्यांचा शोध घेऊन त्यांना वाहने परत केली जाणार आहेत. (Search for abandoned vehicle collaboration with Ganga Mata Vehicle Search Institute Pune Nashik News)

उपायुक्त परिमंडळ एकचे किरणकुमार चव्हाण व उपायुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, विनायक अहिरे, उपनिरीक्षक विठ्ठल माळी, रमेश घडवजे यांनी पुढाकार घेउन मुद्देमाल कारकून वाल्मीक खैरनार, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, अंमलदार राजश्री दिघोळे, नितीन लिलके व गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांनी बेवारस वाहनांचे मालकाचा शोध घेण्यास सुरवात केली.

बेवारस व गुन्ह्यात जप्त वाहन मालकांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. पत्रव्यवहार केल्यानंतर वाहन मालकाने आपले वाहन पत्र मिळताच ८ दिवसाच्या आत घेऊन जावेत वाहने न नेल्यास कायदेशीर प्रकिया पूर्ण करून वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम शासन भरणा करण्यात येईल.

म्हसरूळ पोलिस ठाण्याशी लवकर संपर्क करावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी केले आहे.

abandoned vehicles police station
Nashik News: तांदूळ, हळदीच्या वापरातून साकारली श्रीरामाची प्रतिकृती! हर्षदा खुटेंचे अनोखे अभिवादन!

शहरातही प्रश्न लागणार मार्गी

शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या आवारात शेकडो वाहन बेवारस स्थितीत पडलेली आहेत. याची दखल घेत पोलिस आयुक्त कर्णिक यांनी यातून मार्ग काढत तळेगाव दाभाडे, पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची मदत घेत हा प्रश्न मार्गी लावला आहे.

यामुळे बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जात असून मालकांचा शोध घेत त्यांना त्यांची वाहन परत केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

abandoned vehicles police station
Nashik: मालेगावला लाभले 5 नवे कारभारी! आगामी निवडणुका, कायदा सुव्यवस्थेसाठी तिघा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com