Nashik News : पाण्यासाठी महिला व्हॉल्व्हमनच्या शोधात

Women gathered in search of valveman
Women gathered in search of valvemanesakal

Nashik News : शनिवारी (ता. २८) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असण्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रभाग 30 व 31 मधील काही भागात दुपारी दोन वाजता होणाऱ्या पाणीपुरवठा सायंकाळी पाचपर्यंत न झाल्याने संतप्त महिला व्हॉल्व्हमन शोधासाठी घराबाहेर पडल्या.

सायंकाळी सहा वाजता करंगळी एवढी धार असलेला पाणीपुरवठा झाला खरा मात्र यामुळे महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (search of volvemen by women for water at indiranagar Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Women gathered in search of valveman
Nashik Child Artist : नाशिकच्या बालकलाकारांची अभिनय क्षेत्रात भरारी!

सदिच्छानगर, वनवैभव, रामनगर, एकता कॉलनी, कानिफनाथ नगर, राजीवनगर, सिमेन्स कॉलनी या व्यतिरिक्त इतर कॉलनी परिसरात पाणी न मिळाल्याने नागरिक हवालदिल झाले. एकीकडे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने शनिवार पाणीपुरवठा बंद असल्याची दखल घ्यावी म्हणून संदेश व्हायरल केला.

नागरिकांना शुक्रवारी पाणीच मिळाले नाही. यामुळे पाण्यासाठी 2 ते 3 दिवस वणवण फिरावे लागणार आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला मात्र त्यांचे फोन स्वीच ऑफ होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

"सदिच्छानगर आणि एकता कॉलनी परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे पाणी आले नाही म्हणून तक्रार केली. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन बंद आले. कर्मचारी सुटीवर असल्याचे कारण सांगितले. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार आहे."

- नीलेश साळुंखे, शिवसेना विभागप्रमुख, ठाकरे गट

Women gathered in search of valveman
Nashik News : रस्ता सुरक्षा समितीकडे 305 गतिरोधकांचे प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com