Nashik NMC News : अवैध मिळकतींची आजपासून शोधमोहिम

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

नाशिक : अवैध मिळकतींची शोधमोहिम २६ जानेवारीपासून सुरू होत असून त्यासाठी महापालिका प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. उत्पन्न वाढीसाठी मोहीम राबविली जात असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे. (Search operation for illegal income from today Nashik NMC News)

शहरात अवैध बांधकाम, मिळकतीच्या वापरात बदल, मिळकतींचा अवैध वापर, अनधिकृत नळजोडणी आदी बाबींची तपासणी होणार आहे. २६ ते २९ जानेवारीदरम्यान प्रशासनाने नियुक्त केलेल्या ३१ पथकांच्या माध्यमातून शोधमोहिम राबविली जाणार आहे.

करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी मोहीम असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सोसायटी अपार्टमेंट, कमर्शिअल कॉम्पलेक्स (गाळा, ऑफिस, शोरूम), रो- हाऊस, बंगलो, शैक्षणिक, औद्योगिक मिळकत, निव्वळ हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व्यवसाय, हॉस्पिटल व्यवसाय, मॉल, मोबाईल टॉवर मिळकत, थिएटर-नाट्यगृह मिळकत, सामाजिक संस्था मिळकत आदी ठिकाणी सर्व्हे केला जाणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

NMC Nashik News
Police Felicitation : राज्यातील 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर

पार्किंगमध्ये अनधिकृत हॉटेल, दुकाने असतात. निवासी मिळकतीचा वापर व्यवसायासाठी होतो, अशा ठिकाणे शोधून कडक कारवाई केली जाणार आहे. नळजोडणी तपासणी करून पाणी चोरी शोधली जाणार आहे.

पाणी व घरपट्टी थकबाकीदार असलेल्यांची नळजोडणी कट करण्याची मोहीम कडक केली जाणार आहे. थकबाकीदार मिळकतींवर कायदेशीर लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे.

NMC Nashik News
President's Gallantry Award : निफाडच्या भूमिपुत्राने पटकावला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com