Police Felicitation : राज्यातील 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dattatray Kadnor with Nashik Police Commissioner Ankush Shinde

Police Felicitation : राज्यातील 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील ३१ पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर, चार अधिकार्यांना राष्ट्रपदी पदक जाहीर झाले असून, ३९ पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहायक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे. (Police Felicitation 31 officer employees of state announced with bravery medals nashik news)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने विशेष कामगिरी करण्यात आलेल्या ९०१ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलातील ३१ पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना शौर्य पोलीस पदक, चौघांना राष्ट्रपदती पोलीस पदक तर, ३९ अधिकारी-कर्मचार्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहेत

दरम्यान, यावेळी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राजाराम कडनोर यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे. आयुक्तालयातील ते एकमेव कर्मचारी आहेत.

तर, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव खंडू मुरकुटे यांनाही गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे. पदक प्राप्त झालेल्या कर्मचार्यांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस अधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या १४० शौर्य पदकांपैकी सर्वाधिक ४८ पदके सीआरपीएफ जवानांना देण्यात आले असून, त्याखालोखाल महाराष्ट्र पोलीस दलातील ३१, जम्मू आणि काश्‍मिर पोलीस दलातील २५ जवानांना पदक जाहीर झाले आहेत.

हेही वाचा: Dhule News : धुळे तालुक्यातील 3 रस्त्यांचे भाग्य उजळणार; 30 कोटींचा निधी मंजूर

३२ वर्षांच्या सेवेत ३७७ रिवॉर्डस्‌ (3819५)

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर हे जून १९९१ मध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात भरती झाले. मूळचे उसवाड (ता. चांदवड) येथील रहिवाशी असलेले कडनोर हे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यापासून पोलिस शिपाई या पदावर हजर होत पोलीस सेवेला प्रारंभ केला.

सध्या ते नाशिकमध्येच स्थायिक झाले असून, मुलेही उच्चशिक्षित आहेत. त्यानंतर नाशिकरोड, भद्रकाली, विशेष शाखेसह गुन्हेशाखांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांनी केलेल्या तपासामुळे गंभीर गुन्ह्यातील १२ गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ३२ वर्षाच्या पोलीस सेवेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

२०१५ चा सिंहस्थ कुंभमेळ्यात कडनोर यांनी बंदोबस्ताचे नियोजन, विशेष अतिथींच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडली होती. कडनोर यांना २०१७ मध्ये पोलिस महासंचालक पदकानेही गौरविण्यात आलेले आहे.

आपल्या ३२ वर्षांच्या पोलीस सेवेत कडनोर यांनी ३७७ रिवॉर्डस मिळविले तर, त्यांना ३५ प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे. सध्या ते शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेमध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Grapes Season : जिल्ह्यातील द्राक्षहंगामाचा श्रीगणेशा! फेब्रुवारीत गती येणार

३३ वर्षात २२१ रिवॉर्डस्‌ (38220)

मूळचे सिन्नर येथील रहिवाशी असलेले सुकदेव खंडू मुरकुटे हे १८ जून १९९० रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर भरती झाले होते. त्यांची पहिली नेमणूक मनमाड पोलीस स्टेशनला झाली.

त्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हेशाखा, दहशतवाद विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखेत सेवा बजाविल्यानंतर सध्या ते नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवा बजावत आहेत. ३३ वर्षांच्या पोलीस सेवेत मुरकुटे यांना २२१ रिवॉर्डस्‌ मिळविले आहेत.

तर २०१३ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदक व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आलेले आहे. सेवा काळात त्यांनी विविध गुन्ह्यांची उकल केली असून, दहशतवादी विरोधी पथकात काम करताना औरंगाबाद शस्त्रसाठा व पुण्याच्या जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटातील आरोपींना अटक करण्याच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा: SAKAL Samvad : अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांनी साधला दिलखुलास संवाद