Nashik News: नाट्य शिबिरांच्या हंगामाला बहर! नाटक, मराठी मालिका, चित्रपटांमध्ये बालकलारांची ‘चलती’

Children of Poonam Patil Academy performing a play in a drama camp
Children of Poonam Patil Academy performing a play in a drama campesakal

Nashik News : शाळांना सुटी लागताच उन्हाळी प्रशिक्षण शिबीरांना बहर येतो. यंदा नाट्यशिबिरांनाही ‘अच्छे दिन’ आले असून, शहरात विविध प्रकारच्या शिबिरांना सुरवात झाली आहे.

मात्र, काही व्यावसायिक संस्था पालकांना जाहिरातींची भुरळ घालून फसवत असल्याचेही प्रकार घडत असल्याने पालकांनी खात्री करुनच आपल्या मुलामुलींना नाट्यशिबीरात प्रवेश घेण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. (season of theater camps blooming Movement of child actors in plays Marathi serials films Nashik news)

नाशिकमध्ये नाट्यक्षेत्राला कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांपासूनची समृद्ध अशी प्रदीर्घ परंपरा आहे. ही परंपरा टिकवून ठेवत अत्यल्प दरात बालनाट्य शिबीर घेतले जातात. यात कुसुमाग्रजांनी स्थापन केलेले लोकहितवादी मंडळ असो किंवा मुकेश काळे, आदिल शेख यांची स्कूल ऑफ हार्टस, नाट्यरसिक या संस्थांसह नाट्यक्षेत्रात नाव मिळविलेल्यांमध्ये सचिन शिंदे, विश्‍वास ठाकूर, चैतन्य गायधनी, रसिका चव्हाण, जयदीप पवार, प्रवीण काळोखे हे आपापल्या स्तरावर नाट्यशिबीर घेतात.

मर्यादित विद्यार्थी संख्या आणि अत्यल्प शुल्क हे यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. उन्हाळी सुट्या असल्यामुळे नाट्यशिबीरे जोमाने सुरु झाली आहेत. साधारणत: १० ते १५ दिवसांच्या या शिबिरांच्या माध्यमातून मुलांमधील अभिनय गुण ओळखून त्यांना संधी देण्याचे काम होत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Children of Poonam Patil Academy performing a play in a drama camp
Nashik: इंग्रजी शाळांच्या धर्तीवर जि. प. मॉडेल स्कूलमध्ये सुविधा; विद्यार्थ्यांशी भुसे यांनी सांधला संवाद

खोट्या जाहिरातींपासून सावधान

आमच्याकडे प्रवेश म्हणजे मालिकांमध्ये निश्‍चितपणे स्थान, अशा स्वरुपाच्या जाहिराती करुन पालकांना भुरळ घालण्याचे काम सध्या काही संस्था व व्यक्तींकडून सुरु आहे. त्यापासून पालकांनी सावध राहुन, संस्था किंवा क्लासची अगोदर खात्री करुन घ्यावी. मगच प्रवेश घेण्याचे आवाहन या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे."

खोट्या जाहिरातींद्वारे पालकांना फसवणारे अनेक व्यावसायिक नाटककार तयार झाले आहेत. पालकांनी कुठल्याही क्लास किंवा शिबीरात पाल्याचा प्रवेश निश्‍चित करण्यापूर्वी खात्री करुन घ्यावी. यांचे नाट्यक्षेत्रात काय योगदान राहिले, त्यांचा उद्देश काय आदींची शहानिशा केली पाहिजे."-सुरेश गायधनी, अध्यक्ष, बालनाट्य शिबीर

"बालवयातच अभिनयाची गोडी निर्माण व्हावी यादृष्टीने आम्ही अगदी प्राथमिक स्तरापासून तयारी करुन घेतो. सर्वाधिक विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमातील असल्याने त्यांना शुद्ध मराठी कसे बोलावे, रंगमंचावर कसे वागावे याविषयी शिकवतो. यंदा आम्ही १३ दिवसांचे नाट्यशिबीर घेतले. वर्षभर आम्ही अभिनय क्षेत्राचे धडे विद्यार्थ्यांना देतो."

-पूनम पाटील, संचालिका, पूनम पाटील अॅक्टिंग ॲकॅडमी

"मुला़मुलींना बालवयातच अभिनयाचे बाळकडू प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर गेम्स तयार केले आहेत. दहा दिवसांच्या शिबिरातून प्रमाणपत्र तर मिळतेच; शिवाय, रंगमंचावर स्वत:ला प्रेझेंट करण्याची संधीही मिळते. आम्ही ५ ते १५ मेपर्यंत हे शिबीर घेत आहोत." -मुकेश काळे, संचालक स्कूल ऑफ हार्टस

"उन्हाळी शिबीरांपेक्षा सेमिस्टर पद्धतीने सहा महिन्यांचे प्रशिक्षण वर्ग घेतो. त्यातून विद्यार्थ्यांना नाटकात अभिनय कसा करावा, त्याचे प्रशिक्षण, अभ्यास सहल, तांत्रिक रंगमंच, नाट्य, नृत्य आदी प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न असतो. सहा महिन्यांनी पुन्हा नवीन मुलामुलींना संधी दिली जाते." -जयदीप पवार, संचालक, रंगकर्मी थिएटर

Children of Poonam Patil Academy performing a play in a drama camp
Nashik News : आदिवासींना व्यवसायासाठी मुदत कर्ज योजनेतून कर्जवाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com