नाशिक : मृत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sebi Corporation to hire the heirs of the deceased workers

नाशिक : मृत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा

नाशिक रोड (जि. नाशिक) : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयांतील महामंडळातील मृत कामगारांच्या वारसांना ज्येष्ठतेनुसार कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती इंडिया सिक्युरिटी प्रेस ( India Security Press) मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल यांची केससाठी नियुक्ती

भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयांतील (Securities and Exchange Board of India) २००१ ची वारसांची कोर्ट केस प्रलंबित होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून न्यायालयात प्रकरण दाखल होते. स्टे आणला होता, तो उठविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून संघटनेचे प्रयत्न सुरू होते. त्यातच कोविड संकटामुळे अनेक अडथळे आले. दोन वर्षे न्यायालयाचे कामकाज ठप्प होते. मुद्रणालयाचे न्यायालयाचे कामकाज सोलोमन ॲन्ड कंपनी मॅनेजमेंट बघत होती. संघटनेने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्थापकांकडे आणखी एक सीनियर सॉलिसिटरची (Senior Solicitor) मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल आशुतोष कुंभकोणी यांची या केससाठी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा: माधबी पुरी बुच बनल्या SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्षा

याप्रकरणी हायकोर्टात नुकताच युक्तिवाद झाला आणि अनेक दिवसांची हरकत ही व्हॅकेट झाल्याचा निकाल कोर्टाने दिला. २०१२ नंतर कामगार पॅनलने सत्ता हाती घेतल्यावर मृत कामगारांच्या वारसांना नोकरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश येऊन ४ फेब्रुवारी २०१३ व त्यानंतर मृत झालेल्या कामगारांच्या वारसाला नोकरी मिळेल, असे प्रेस महामंडळाचे अनुकंपा धोरण (Compassionate policy) मंजूर करून घेतले. त्यानंतर दोन्ही प्रेससह देशभरातील अन्य प्रेसमध्ये मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्यात संघटनेला यश आले.

हेही वाचा: शिरपूर : बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त

सुरवातीला या धोरणामध्ये शिक्षण, वय तसेच नऊ युनिटची एकत्रित ज्येष्ठता आदी अटी होत्या. संघटनेने सुरवातीला धोरण यशस्वीपणे अमलात आणून नंतर सर्व अटी शिथिल करून घेतल्या. पूर्वी भरती झालेल्या कामगारांच्या ५ % कामगार अनुकंपा तत्त्वावर घेण्याची अट होती. त्यात बदल करून भरती झाली अथवा नाही झाली तरीही एकूण रिक्त जागांच्या ५ % कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचे तसेच कम्बाईन ऐवजी युनिटप्रमाणे ज्येष्ठता व्यवस्थापनाकडून मंजूर करून घेण्यात मजदूर संघाला यश आले. या यशासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, बी. जे. गुप्ता, मुद्रणालयाचे महाव्यवस्थापक व्यंकटेश कुमार, महापात्रा, विनोद महरिया, नवीन कुमार आदींनी प्रयत्न केले होते.

Web Title: Sebi Corporation To Hire The Heirs Of The Deceased Workers Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikhemant godsesebi
go to top