NMC News : नाशिक महापालिका आरोग्यसेवेच्या टोल फ्री क्रमांकासाठी राज्यात दुसरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials of General Health Committee while felicitating Additional Commissioner of Municipal Corporation Bhagyashree Banait.

NMC News : नाशिक महापालिका आरोग्यसेवेच्या टोल फ्री क्रमांकासाठी राज्यात दुसरी!

नाशिक रोड : नाशिक हे एक आयुर्वेद हब होत असताना नाशिक शहरात गुणात्मक, दर्जात्मक सेवा मिळायला हव्यात, या उद्देशाने नाशिकच्या रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य मित्रांनी मागणी केल्यानुसार नाशिक महापालिका टोल फ्री नंबर तयार करणार आहे.

त्यामुळे नाशिक महापालिका टोल फ्री नंबर निर्माण करणारी महाराष्ट्रातील दुसरी महापालिका ठरणार आहे. (Second in state for toll free number of Nashik NMC Health Service News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तक्रार निवारण कक्ष रुग्णाच्या समस्येच्या नोंदणी आणि ती सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध झाला असल्याची अधिकृत माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी जनआरोग्य समिती नाशिक यांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

जनआरोग्य समिती नाशिकने यासाठी पाठपुरावा केला होता. सांगली, मिरज कुपवाड महापालिका ही सेवा देत असून, आता रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांक नाशिक महापालिका देणार आहे. या संदर्भात टोल फ्री नंबर कसा असेल, कोणता असेल, आरोग्यसेवा याद्वारे कशा मिळणार याची माहिती येत्या काळात महापालिका प्रशासनाद्वारे देण्यात येईल.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांचा सत्कार करण्यात आला. जनआरोग्य समिती नाशिक समन्वयक संतोष जाधव, नाशिक रोड समन्वयक गौतम सोनवणे, ॲड. नाझीमुद्दीन काझी, फहीम शेख, संगीता कुमावत, शोभा पवार, ॲड. नीलेश सोनवणे, आसिफ शेख, रवींद्र जगताप, मुकेश बेलदार, पद्माकर इंगळे आदी उपस्थित होते.