Saptashrungi Devi Chaitrotsava 2023 : सप्तश्रृंगगडावर उद्यापासून चैत्रोत्सव! प्रशासन सज्ज..

Saptashrungi chaitrotsava 2023
Saptashrungi chaitrotsava 2023esakal

वणी (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तश्रृंग मातेच्या चैत्रोत्सवास (Saptashrungi chaitrotsava 2023) गुरुवार (ता. ३०)पासून सुरवात होत असून, यात्रोत्सव काळात गडावर प्लस्टीक बंदीच्या अंमलबजाणीसह भाविकांच्या वाहतूकीसाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करुन देण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी दिले आहेत. (Chaitrotsava 2023 of Saptashrungi Mata is starting from 30 march nashik news)

तसेच, न्यासातर्फे भाविकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जनसुरक्षा विमा काढण्यात आला असून, पदयात्रेकरुंच्या निवाऱ्यासाठी वॉटरफ्रुप मंडप उभारण्यात येत आहे.

सप्तश्रृंगी गडावर ३० मार्च ते ६ एप्रिलपर्यंत चैत्र यात्रोत्सव होत आहे. यात्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात मंगळवारी (ता. २८) सप्तश्रृंगी देवी ट्रस्टच्या कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या वेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गत शारदीय नवरात्रोत्सव काळातील अनुभवांच्या पार्श्‍वभूमीवर सुस्थितीत असलेल्या नव्या बसेस, क्रेन, पिण्याचे पाणी आदी उपलब्ध करुन देण्याचे आदेश नरवाडे यांनी दिले. नांदुरी ते सप्तशृंगी गड दरम्यान १०० बसेस, तर नाशिक विभागातून २५० बसेसद्वारे यात्रोत्सव काळात भाविकांची वाहतूक केली जाईल. ट्रस्टतर्फे भाविकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी, शिवालय परिसरात निवाऱ्यासाठी वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Saptashrungi chaitrotsava 2023
Police Combing Operation : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कोम्बिंगचा उतारा; पोलिसांची रात्रभर कारवाई

बैठकीतील निर्णय

* यात्रोत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गड खासगी वाहानांसाठी बंद

* बंदोबस्तासाठी १ पोलिस उपअधिक्षक, ५ निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, २५० पोलिस व ३०० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव शीघ्र कृती दलाची १ तुकडी

* वीस ठिकाणी डिजिटल सूचना फलक

* २५६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत निगरानी

* १५ ठिकाणी बाऱ्या लावण्यासाठी व्यवस्था

* मंदीर २४ तास खुले राहाणार

* सुरक्षा विभागातील १० व राज्य सुरक्षा महामंडळाचे ४० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रीयेतील ४० स्वयंसेवक असे एकूण ९२ कर्मचारी

* बागलाण अॅकॅडमीचे १२०, मुंबईच्या अनिरुद्ध अकॅडमीतील २०० सेवाभावी स्वयंसेवक

* सप्तश्रुंग ट्रस्टमार्फत यात्रा कालावधीत सकाळी ११ ते रात्री १०.३० यावेळेत मोफत भोजनाची व्यवस्था

* १० ठिकाणी पाणपोयी व ८ ठिकाणी वॉटर कुलरची व्यवस्था

* २४ तास वैद्यकीय सेवा व मोफत औषधोपचार

* भाविकांसाठी सप्तश्रृंगी देवी ट्रस्टचा २ कोटींचा जनसुरक्षा विमा, हंगामी कर्मचाऱ्यांसह शिखरावर ध्वजारोहणाच्या मानकऱ्यांचाही स्वतंत्र विमा

Saptashrungi chaitrotsava 2023
Nashik News : अडीच वर्षांनंतर होणार ‘झूम’ बैठक; निमाच्या प्रयत्नांना यश!

* बसेसमध्ये जास्त प्रवासी वाहतूक करू नये

* ​दर्शनासाठी मंदिरात ३ ठिकाणी दर्शन पादुकांची व्यवस्था

* दिपमालेसाठी पहिल्या पायरीला तेल अर्पण करण्याची व्यवस्था

​* नांदुरी येथे बसस्थानक व वाहन पार्किंग व्यवस्था

​* नारळ मंदिरात न नेता पहिल्या पायरीजवळ व्यवस्था

* परशरामा बाला प्रदक्षिणा मार्ग बंद ठेवण्यात येईल ​

* ग्रामस्थांना यात्रा कालावधीत मालवाहतूक करण्यासाठी पासेस

* २४ तास विद्युत पुरवठा

* अग्निशरमक दलाचे बंब व जवान तैनात, एकूण ८४ अग्निशमन सिलेंडर (सिजफायर)

* टोल फ्री क्रमांक सुविधा : (०२५९२) २५३३५०

Saptashrungi chaitrotsava 2023
Nashik Ram Rathotsav 2023 : पोलिस, मनपाकडून रथ मार्गाची पाहणी; तयारी अखेरच्या टप्प्यात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com