esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ऑटोमोबाईल कंपन्यांना फटका; वाहन विक्रीत मोठी घट
sakal

बोलून बातमी शोधा

Automobile

पेट्रोल, डिझेल व स्टीलच्या वाढलेल्या किमतीमुळे औद्योगिक क्षेत्राचे कंबरडंच मोडल्याने अनेक कंपन्यांचे वेंडर व सब वेंडरांनी आपले उत्पादन बंद केले आहे. मात्र, आता अनलाॅक झाल्यामुळे परिस्थिती बदलेल, अशी आशा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ऑटोमोबाईल कंपन्यांना फटका

sakal_logo
By
सतिष निकूंभ

सातपूर (नाशिक) : ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहन उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बहुतांश कंपन्यांची वाहन विक्री एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये घटली आहे. कोरोना (Coronavirus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) , महिंद्र ॲन्ड महिंद्र (Mahindra & Mahindra), टाटा मोटर्स (Tata Motors) आदी कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. (second wave of Corona led to a decline in automobile company vehicle sales)

पेट्रोल, डिझेल व स्टीलच्या वाढलेल्या किमतीमुळे औद्योगिक क्षेत्राचे कंबरडंच मोडल्याने अनेक कंपन्यांचे वेंडर व सब वेंडरांनी आपले उत्पादन बंद केले आहे. मात्र, आता अनलाॅक झाल्यामुळे परिस्थिती बदलेल, अशी आशा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असणाऱ्या मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) कार विक्री एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये ७१ टक्क्यांनी घटली आहे. मेमध्ये या कंपनीच्या ४६,५५५ कार विकल्या गेल्या. विविध राज्यांतील लॉकडाउनमुळे कंपनीच्या कार उत्पादनावर विपरित परिणाम झाला. वैद्यकीय ऑक्सिजन पुरविण्यासाठी या कंपनीने १ ते १६ मेदरम्यान उत्पादन बंद केले होते.

हेही वाचा: नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांचे स्थलांतर

महिंद्र ॲन्ड महिंद्रचीही (Mahindra & Mahindra) घसरण

प्रवासी वाहने, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांच्या उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीच्या वाहन विक्रीत मेमध्ये ५२ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कंपनीने मेमध्ये १७,४४७ वाहनांची विक्री केली. कर्मचारीसह देशातील नागरिकांना सरळ हाताने मदत करणारे व विविध वाहनांचे उत्पादन करणाऱ्या टाटा मोटर्ससाठीही मे महिना वाईट गेला. एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये या कंपनीची वाहन विक्री ३८ टक्क्यांनी घसरली. मेमध्ये टाटा मोटर्सने २४, ५५२ वाहनांची विक्री केली. मात्र, गेल्या वर्षी मेमध्ये या कंपनीची स्थिती आणखी वाईट होती. यामुळे औद्योगिक क्षेत्रात अनेक लघुउद्योगाचे काम ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

(second wave of Corona led to a decline in automobile company vehicle sales)

हेही वाचा: नाशिकच्या पंधरावर्षीय निखिलला स्पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिप