esakal | १५ जूनपासून भरणार वरिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग; पुणे विद्यापीठाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-University

१५ जूनपासून भरणार वरिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या अध्ययन प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातील तारखांची घोषणा केली आहे. अभ्यासक्रमनिहाय या तारखा विभिन्न असल्‍या तरी काही अभ्यासक्रमांच्‍या सत्रास येत्‍या १५ जूनपासून सुरवात होणार आहे. तूर्त ऑनलाइन स्‍वरूपातच वर्ग सुरू होण्याची शक्‍यता आहे. (Senior college classes to be held from June 15 Nashik News)

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ला मोठा फटका बसला असून, बहुतांश संपूर्ण वर्षभर ऑनलाइन अध्यनावर विद्यार्थ्यांची भिस्‍त होती. परीक्षादेखील ऑनलाइन स्‍वरूपात घेण्यात आल्‍या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्‍या सुरवातीचा काही काळही ऑनलाइन अध्ययन प्रक्रिया राबवावी लागण्याची शक्‍यता आहे. पुणे विद्यापीठातर्फे सत्र सुरू करण्यासंदर्भातील तारखांची घोषणा केली आहे. १५ जूनपासून तसेच काही अभ्यासक्रमांच्‍या वर्गांना जुलै व ऑगस्‍टमध्ये सुरवात होणार आहे. प्रामुख्याने १५ जूनला विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत येणाऱ्या विज्ञान, अभियांत्रिकी शाखेतील काही वर्षांच्‍या, तसेच वाणिज्‍य व व्‍यवस्‍थापन विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांत वाणिज्‍य शाखेचे काही वर्गांना सुरवात होईल. औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील बी. फार्मसीचच्‍या तृतीय, चौथ्या वर्षाला तसेच, एम. फार्मसीच्‍या द्वितीय वर्षाला २० ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे. शासनाने जारी केलेल्‍या दिशानिर्देशानुसार अध्ययन प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात पुणे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा संपूर्ण शिक्षणक्रम पूर्ण करणेही बंधनकारक केलेले आहे.

हेही वाचा: VIDEO : भाजप नगरसेविकेच्या पतीने रुग्णालयात घुसविली कार; नाशिकमधील संतापजनक प्रकार

प्रथम वर्षाच्‍या तारखांची घोषणा नंतर

बारावीनंतर विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाकरिता सीईटीच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जातो. अशात ही संपूर्ण प्रक्रिया होणे बाकी असल्‍याने प्रथम वर्षाच्‍या सत्र सुरू करण्याच्‍या तारखांबाबत नंतर घोषणा केली जाईल, असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. (Senior college classes to be held from June 15 Nashik News)

loading image
go to top