Police
sakal
नाशिक: हिरावाडीतील सावतानगर येथे पोलिस असल्याची बतावणी करीत संशयित चौघांनी ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या, तर उपनगर येथे ६० वर्षीय महिलेच्या अंगावरील ८० हजारांचे दागिने लांबवीत गंडा घातला आहे. या प्रकरणी पंचवटी, उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना हेरून गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या टोळीला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.