esakal | कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची फरफट; अनेकांचे जीव टांगणीला
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची फरफट; अनेकांचे जीव टांगणीला

sakal_logo
By
विक्रात मते


नाशिक :
कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेऊन महिना पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना विविध केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची फरफट झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नागरिकांना आजही केंद्रांवरून परत जावे लागले. महापालिकेला प्राप्त झालेल्या साडेचार हजार डोस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी वापरण्यात आल्याने दुसऱ्या डोससाठी वाट पाहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. (Senior citizens waiting for the second dose of Covaxin)


आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक नागरिकांना कोव्हिशीइल्ड (Covishield) व कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले. सर्वाधिक कोव्हीशील्डचे डोस नागरिकांना देण्यात आले. कोव्हिशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे प्रमाण अतिशय अल्प आहे. लाखो नागरिकांनी महिनाभरापूर्वी कोव्हॅक्सिनचे डोस घेतले, मात्र दुसरा डोस घेण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. बुधवारी (ता.५) महापालिकेला कोव्हॅक्सिनचे साडेचार हजार डोस प्राप्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच कोव्हॅक्सिनचे डोस देण्याच्या सूचना असल्याचा दावा वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचे डोस यापूर्वी घेतली त्यांची मुदत संपुष्टात आली आहे. दुसरीकडे लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय, नाशिक रोड विभागातील खोले मळा, मायको दवाखाना या केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात आहे.

हेही वाचा: धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री


साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर

कोव्हिशील्ड लसीचे बुधवारी ८००० डोस महापालिकेला प्राप्त झाले. दोन दिवसांपासून डोस वापरले जात आहे. मात्र जेमतेम शनिवारपर्यंत पुरतील एवढे डोस शिल्लक आहे. त्यानंतर मात्र पुन्हा डोससाठी वाट पहावी लागणार असल्याने लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


ओळखपत्र आवश्‍यक

www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी करत असताना जे कागदपत्र अपलोड केली असतील त्यापैकी १ ओळखपत्र म्हणून सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे, असे महापालिकेने कळविले आहे. सकाळी १० ते ४ वेळेत लसीकरण सुरु राहणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी आदल्या दिवशीच लसीकरणाची नोंदणी सायंकाळी ७ ते १० यावेळेत केल्यास नोंदणी करता येऊ शकेल.

Senior citizens waiting for the second dose of Covaxin

हेही वाचा: नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात